मुंबई : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व हे सर्वांत जास्त गाजेलेलं पर्व ठरलं होतं. तब्बल दोन वर्षांनी बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बिगबॉस मराठी ५ या पर्वाने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले. सुरज चव्हाण हा या पर्वाचा विजेता ठरला होता, तर अभिजित सावंत हा रनरअप ठरला होता. या सीझनची भलतीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली होती.आता पुन्हा एकदा बिग बॉस मराठी ५ चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.याची अधिकृत घोषणा कलर्स मराठीनं केली आहे.कलर्स मराठीनं आपल्या इन्स्टाग्रामवर बिगबॉस मराठी ५ चा प्रोमो शेअर केला आहे. येत्या १० फेब्रुवारीपासून दररोज दुपारी ३वाजता कलर्स मराठीवर वाहिनीवर पुनःप्रक्षेपण होत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. बिग बॉस मराठी’चं पर्व संपून आता चार महिने उलटले आहेत. तरीही या सीझनची अजूनही बरीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’नं लाडक्या प्रेक्षकांसाठी पाचव्या पर्वाचं पुनःप्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील एकापेक्षा एक असेल्या सर्वंच स्पर्धकांनी प्रेक्षकाचं भरपूर मनोरंजन केलं. निक्की तांबोळीचा बाईSSS हा शब्द असो किंवा सूरज चव्हाणचा झापूक झुपूक डान्स प्रचंड व्हायरल झाला, त्यावर रीलही बनवल्या गेल्या. विशेष म्हणजे रितेश देशमुखच्या होस्टिंगने तर सर्वांचं मन जिकलं. आता कलर्स वाहिनीमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’चा आनंद घेता येणार आहे.