आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई, गोध्रा हत्याकांडाचा फरार मुख्य आरोपी अखेर गजाआड

0

कल्याण : गुजरातमध्ये घडलेले बहुचर्चित गोध्रा हत्याकांडात जन्मपेठ झालेला आरोपी पॅरोल रजेवर फरार होवून चक्क महाराष्ट्रात दरोडा टाकला. नगर-कल्याण महामार्गावर पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी उभ्या असलेल्या आयशर टेम्पोमधून टायर चोरीसाठी इतर चार आरोपींची मदत घेत दरोडा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा (५५) रा. गोध्रापंचमहाल ता. गोध्रा जि. पंचमहाल राज्य गुजरात असे सदर गुन्हयातील मुख्य आरोपीचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी गुन्हाच सखोल तपास करत मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिस स्टेशन व नाशिक जिल्यातील सिन्नर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्यावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात १६ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.

आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, ७ जानेवारी २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास आळेफाटा पोलिस स्टेशन हद्दीत मौजे आणे गावचे हद्दीत इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाचे आतील मोकळे जागेत फिर्यादी वाहन चालक सोमनाथ नारायण गायकवाड वय ३० वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. करकंब ता. पंढरपुर जि. सोलापुर हा त्याच्या ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो कमांक एमएच ०५ डीके ७६३३ यामध्ये भिवंडी येथील जेके टायर्स अ‍ॅन्ड इंडस्टील लि. शक्ती लॉजीस्टीक पार्क भिवंडी महाराष्ट्र कंपनीचे गोडावून मधून १६५ टायर घेऊन सोलापुर येथे जात असताना आणे परिसरात झोपला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech