प्रसिद्ध तेलगु चित्रपट निर्माता के. पी. चौधरी यांनी गोव्यात संपवले जीवन

0

पणजी : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलगु चित्रपट निर्माता के. पी चौधरी उर्फ सुनकारा कृष्णा प्रसाद चौधरी यांनी गोव्यात आत्महत्या केली आहे. के. पी चौधरी यांना काही वर्षापूर्वी अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता त्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे.

के पी चौधरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक नामवंत निर्माते असून त्यांनी मेगास्टार रजनीकांत यांच्या ’कबाली’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. २०२३ मध्ये त्यांना हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. टॉलीवुड आणि कॉलीवुडमध्ये ड्रग्जचा धंदा करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.चौधरीचा मास्टर माईंड एडविन न्युनिस याच्याशी देखील संबंध असल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्यावर कर्ज खूप होते. कर्ज फेडण्याचा त्यांच्यावर दबाव होता. अशातच, कोरोना काळात सगळं ठप्प झाल्यानंतर ते ड्रग्जच्या धंद्यात गुंतले. यातील कमाईतून ते त्यांचा उदर्निर्वाह करत होते.

यानंतर चौधरी काही दिवसांपूर्वी गोव्यात शिफ्ट झाला होते व येथेच त्यांनी क्लब देखील सुरु केला. पण व्यवसायात तोटा झाल्याने चौधरी आर्थिक समस्यांचा सामना करत होते. या घटनेनंतर चौधरी खचले होते शिवाय आर्थिक अडचणींचा देखील सामना करत असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. के. पी. चौधरी यांनी रजनीकांत यांच्या प्रसिद्ध कबाली चित्रपटासह विविध हीट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात गब्बर सिंग, अर्जुन सुरावरम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. चौधरी यांनी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तेलगु, तामिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech