नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि उत्पादनशुल्क घोटाळ्यातील आरोपी मनीष सिसोदिया यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांना जंगपुरा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. दिल्लीतील पटपडगंज हा मनीष सिसोदिया यांचा मतदारसंघ होता. परंतु, यावेळी आम आदमी पार्टीने त्यांनी जंगपुरात मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. गेल्या तीन निवडणुकीत आम आदमी पक्षाची जंगपुरा मतदारसंघावर मजबूत पकड राहिली होती. पण यावेळी ‘आप’च्या हातून ही जागा निसटली आहे. जंगपुरा मतदारसंघात झालेला पराभव मनीष सिसोदिया यांनी स्वीकारला आहे. पराभवानंतर सिसोदिया म्हणाले की, “पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगली लढत दिली; आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली. लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला. पण, मी ६०० मतांनी हरलो. जे जिंकले आहेत त्या उमेदवाराचे मी अभिनंदन करतो. मला आशा आहे की ते मतदारसंघासाठी काम करतील असे सिसोदिया यांनी सांगितले.