उदय सामंतांनी केली ९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी

0

मुंबई : मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. त्या निमित्ताने आज मराठी भाषा मंत्री श्री सामंत यांनी या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, समन्वयक डॉक्टर शैलेश पगारिया तसेच त्यांचा चमू यावेळी उपस्थित होता.

येथे विविध महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार असणार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव असणार आहे. तर अतिविशिष्ट प्रवेशद्वाराला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यात आले. तसेच सभागृह क्रमांक एकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव, तर सभागृह दोनला यशवंतराव चव्हाण त्यांचे नाव देण्यात येणार आहे. व्यासपीठाला स्व. काकासाहेब गाडगीळ आणि स्व. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची नावे असणार आहेत. जवळपास ४००० व्यक्तींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व सभागृहात होणार आहे अशी माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना या पाहणी दौऱ्याच्या वेळी दिली.

पुणे येथून विशेष ट्रेन दिल्ली येथे १९ तारखेला सुटणार आहे या ट्रेनमध्येही साहित्यिक विषयक परिसंवाद तसेच कवी संमेलन चे आयोजन होणार असल्याची माहिती नहार यांनी सामंत यांना दिले. साहित्य संमेलनासाठी दिल्ली येथे होणाऱ्या नियोजन कसे असणारे याचीही माहिती नहार यांनी सामंत यांना दिली. महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण पाठबळ या साहित्य संमेलनाला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech