पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबईत एकाला अटक

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रांस दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन मुंबई पोलिसांना आला. या फोनमुळे खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी चेंबूर येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. सध्या या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. तसेच पोलिस तपास करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यानंतर ते अमेरिकेला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मंगळवारी मुंबई पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली. त्याने दिलेल्या धमकीबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी माहिती दिली. पोलिसांनी या संदर्भात इतर एजन्सींनाही कळवले आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान या कॉल प्रकरणी मुंबई पोलिसांनी चेंबूर परिसरातून एका व्यक्तीला अटक केली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यावर तो मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचं समोर आलंय. या पूर्वी देखील मुंबईत शाळा, कॉलेज, एयरपोर्टवर बॉम्ब हल्ला होण्याचे अनेक फोन कॉल्स मुंबई पोलिसांना मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा वेठीस धरल्या जात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अध्यक्ष पदाच्या कालावधीत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याचे व हे संबंध उंचीवर नेण्याची मोठी संधी असून त्या दृष्टीने हा अमेरिका दौरा असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. आज ते फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून आपण फ्रान्सच्या दौऱ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech