४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

0

मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत फोरम ऑफ यंग ग्लोबल लिडर्सच्या ५० युवा सदस्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारताच्या शैक्षणिक दौऱ्यावर आलेल्या ४० देशांतील या नेत्यांनी राज्यपालांशी संवाद साधला. जगभरातील युवा नेत्यांच्या सुसंवादातून जगासमोरील सामायिक आव्हानांवर उपाय शोधता येतील असे सांगून युवकांनी संपत्ती निर्माण करावी मात्र अर्जित संपत्तीचा विनियोग समाजासाठी करावा असे आवाहन राज्यपालांनी केले.

जागतिक युवकांच्या या फोरममध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, टेनीस दिग्गज रॉजर फेडरर आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे ही अभिमानाची बाब आहे असे सांगून युवकांनी सर्वसमावेशक विकासासाठी काम करावे असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी युवा उद्योजक अमेय प्रभू, एमडी, नफा कॅपिटल, गौरव मेहता, संस्थापक, धर्मा लाइफ आणि अन्य युवा नेते उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech