कोकण रेल्वे मार्गावर महाकुंभ मेळ्यासाठी विशेष रेल्वे गाडी

0

रत्नागिरी : प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याला जाण्याकरिता कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. उडुपी ते प्रयागराज जंक्शन आणि परत या मार्गावर ही गाडी धावेल. त्याचा तपशील असा – गाडी क्र. ०११९२ उडुपी टुंडला जंक्शन गाडी सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून सुटेल. ही गाडी टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी (बुधवार, १९ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला गाडी क्र. ०११९१ गाडी तुंडला जंक्शन येथून गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी शनिवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी उडुपीला पोहोचेल. ही गाडी बारकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड, बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरीया, मदनीक, माणिकपूर, जं. प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन येथे थांबेल.गाडीला एकूण २० डबे असतील. त्यातील 2 टायर एसी १ कोच, 3 टायर एसी ५ कोच, -स्लीपर १० कोच, जनरल – २ आणि एसएलआर २ कोच असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech