आरेवारे पर्यटन विकासासाठी पाच कोटीचा निधी – पालकमंत्री

0

रत्नागिरी : वन विभागाने परदेशातील ॲडव्हेन्चर पार्कप्रमाणे आरेवारे येथे पर्यटनावर आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून पाच कोटी निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहात पालकमंत्री श्री. सामंत यांनी विविध बैठका घेतल्या. त्यावेळी ते म्हणाले, वन पर्यटन, इको टुरिझम याबरोबरच वॉच टॉवर दुरुस्ती, वनभ्रमंती पोर्टल, आवश्यक असणाऱ्या बसेस, महिंद्रा जीप यासारख्या सुविधांवर वन विभागाने भर द्यावा. त्याचबरोबर जुवे जैतापूर येथे कांदळवन आधारित नियोजन करावे. स्मार्ट सिटी बाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि रत्नागिरी पालिकेने तातडीने नियोजन करून विकासकामांना सुरुवात करावी, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, गटविकास अधिकारी यांची बैठक तहसीलदारांनी घ्यावी आणि मिऱ्या शिरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मार्गी लावावी.

या योजनेसाठी ज्या ज्या गावांतून अडचणी येत आहेत, त्याबाबत संबंधित गावांच्या सरपंचांबरोबर बैठक घेऊन त्यांना त्याची माहिती द्यावी, अशीही सूचना पालकमंत्र्यांनी केली. बैठकीला उपवन संराक्षक गिरीजा देसाई, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे तांत्रिक सल्लागार सुनील देशमुख, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech