सोलापूर : महायुतीत सर्व अलबेल नाही याची चर्चा माध्यमात रोज सुरू असते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीत युद्धाबाबत तर रोज नवनवीन बातम्या समोर येत असतात. मात्र, यावेळी आजी-माजी मुख्यमंत्र्यांना शह देण्याचा प्रयत्न झाला असून यामागे अजित दादाच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याला कारणही तसंच आहे, विठ्ठल भक्तांना अल्प वेळेत देवाचे दर्शन मिळावे यासाठी मंजूर झालेला प्रकल्प निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने रद्द केल्याने आता हाय पॉवर कमिटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शिखर समिती याने मंजूर केलेला प्रकल्प आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शंभर दिवसाच्या प्राधान्य प्रकल्पात समावेश केलेल्या प्रकल्पाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणाच्या आदेशाने रद्द केली असा सवाल भाविकातून केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीने जेव्हा एखादा प्रकल्पाला मंजुरी मिळते, तेव्हा त्यात बदल करायचा अधिकार कोणालाही नसतो. यातच माजी मुख्यमंत्र्यांच्या या प्रकल्पाला विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य क्रमाने 100 दिवसात करावयाच्या कामात समावेश केल्यानंतर अशी कोणती ताकद आहे, जी आजी-माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठी आहे, असा संतप्त सवाल भाविक करू लागले आहेत.