प्रयागराज : भाजप पक्षाच्या प्रवक्त्या नाझिया इलाही खान या प्रयागराज महाकुंभला जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. हल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. नाझियाने सांगितले की, काही कट्टरपंथी इस्लामिकांनी तिचा पाठलाग केला होता. त्यांच्यासोबत एक लहान मुलगी आणि प्रिया चतुर्वेदी होत्या. या घटनेमध्ये प्रियाच्या डोक्याला मार लागला आहे. नाझियाच्या हाताला दुखापत झाली होती. नाझिया यांच्या वाहनावर हल्ला झाल्याने वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. त्यांनी त्यांच्या वाहनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. भाजपच्या प्रवक्त्यांच्या मते, प्रियाची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांनी लोकांना प्रिया आणि त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची माहिती नाझिया यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. नाझिया खान या हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या एक मुस्लिम महिला आहेत. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या त्या सदस्या म्हणून त्यांनी काम केले. नाझिया यांनी ट्रिपल तलाकविरूद्धही आवाज उठवला होता. २०१८ मध्ये त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता.