ठाणे : नुकताच डॉ .काशिनाथ घाणेकर सभागृहात ठाण्यातील अदा संस्थेचा कथ्थक नृत्यात विशारद परीक्षा उत्तीर्ण केलेल्या सृष्टी कणिकदळे आणि नीती राव या नृत्यांगनांचा समर्पण सोहळा संपन्न झाला. अदा या संस्थेला २० वर्ष पूर्ण झाली असून समर्पण सोहळ्याचे हे ५ वे वर्ष आहे. विशारद पूर्ण केलेल्या नृत्यांगनांना समर्पण नावाचा स्वतंत्र किंवा सोलो कार्यक्रम सादर करण्याची संधी अदा द्वारे दिली जाते असे संस्थेच्या संस्थापिका आणि गुरु नृत्यालंकार श्रीमती अरूपा रॉय चौधरी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आप्तस्वकीय, मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तीं उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाखा ठाकूर यांनी केले.