भोकरदनमधील पिडीत कैलास बोराडे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई : जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना अतिशय दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्यशासन करेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत सांगितले. भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधानसभेत सदस्य छगन भुजबळ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदन केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यासंदर्भात जालन्याच्या पोलिस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे. बोराडे यांना झालेली मारहाण अतिशय अमानुष आहे. या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना ‘मकोका’ लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईल. मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासन करेल मी स्वतः बोराडे यांच्याशी फोनवरून बोललो होतो. त्यांची विचारपूस केली, सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांना दिली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech