सिंहस्थातील गर्दीच्या नियोजनावरती लक्ष, रेल्वे फलाटांची संख्या वाढविणार – विभागीय आयुक्त

0

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाने गती घेतली असून रस्ते रेल्वे स्थानक व पोलिसांचे गर्दीचे नियोजन याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रयागराज दौरा व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये विविध विभागांच्या कामाच्या दिशेने प्रगतीचा आढावा घेण्यात आला. नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरील चार फलाट आहेत. त्या व्यतिरिक्त पूर्वे कडील ११ एकर जागेवर अतिरिक्त फलाट उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, तसेच नाशिकला दाखल होणार्या भाविकांसाठी ‘फोल्डिंग एरिया’ तयार करण्याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. नाशिक रोड स्थानकाजवळ मेट्रो सॅण्ड, नाशिक पूणा रेल्वेचा स्टॉप, एसटी सिटीलिंकचा स्टॉप यांचे एकत्रित इंटिग्रेटेड हब उभारण्याचा प्रस्ताव तयार करुन त्याचे पीपीपी मॉडेल तयार करण्याच्या सुचना आर्किटेक यांना देण्यात आले. हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारला जाणार असल्याचेही हॉ. गेडाम यांनी सांगितले .

प्रयागराज मधील गर्दीचे अवलोकन केल्यानंतर नाशकात संभाव्य ज्यादा गर्दी लक्षात घेता घाटांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली असून, प्रयागराज येथील अभियंत्यांच्या सुचनेप्रमाणे नाशिकमध्ये आणखी घाट बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. त्यासाठी प्रामुख्याने तपोवन संगमाच्या पलीकडील भागात घाट बांधणे, लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरील भाग, दसक पचक भागात गोदावरीच्या दोन्ही बाजूला घाट बांधण्याचा विचार करता येणे शक्य असल्याचे सूचवण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळा प्रत्यक्ष पहाणीतून निर्णय घेतला जाणारा आहेत.

नाशिक शहरातील रस्त्यांचे टेंडर काढण्याचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांच्या नियोजनाचा आढावा सादर करण्याच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या. एसटीपी चे टेंडर झालेले आहेत. रस्ते उभारण्यात जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे हे काम आता सुरू करणे गरजेचे असल्याने त्याचे तातडीने नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. सद्यस्थितीत साधू ग्रामची जागा ३७५ एकर एवढी आहे. ही जागाअपूरी पडणार असल्याने त्यात दुपटीने वाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत त्या दृष्टीने नांदूर मानूर पर्यंतच्या जागेचा विचार करता येणे शक्य असल्याच्या सुचना डॉ. गेडाम यांनी अधिकार्यांना दिल्या. प्रशासनाने तातडीने याबाबतचा आढावा तयार करावा व जागांचे सर्वेक्षण करावे असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech