मुंबई : अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा आणि योजना यांना कात्री लावण्यात आलेली नाही. राज्याचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. विकास आणि योजना यांची सांगड या अर्थसंकल्पात घालण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला हा अर्थसंकल्प योगदान देणारा ठरेल. देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थसंकल्पच्या उद्दिष्टामध्ये महाराष्ट्राचे १ ट्रिलीयन ड्रॉलरचा उद्दिष्ट या अर्थसंकल्पामुळे साध्य होईल. पायाभूत सुविधा, संपर्क यंत्रणा, उद्योग या सर्वांना हा अर्थसंकल्प चालना ठरेल.