अवयव दान अभियान आणि मोफत नेत्र तपासणी

0

जीवनविद्या मिशन तर्फे आयोजित उपक्रमाला चांगला प्रतिसाद
मुंबई :  जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र नवी मुंबई २, अंतर्गत स्वानंद योग साधना केंद्र, पनवेल आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच अवयव दान अभियान आणि मोफत नेत्र चिकित्सा शिबिर यांचे आयोजन करण्यात आले. अवयव दान हे श्रेष्ठ दान याच्या जनजागृतीसाठी हे अभियान राबविण्यात आले. या अवयवदान अभियान अंतर्गत हृदय, यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंडे, स्वादुपिंड, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाच्या झडपा आणि कानाचे पडदे शरीरातील हे अवयव दान करता येतात, जीवनविद्या मिशन आणि महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (ZTCC) यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविला जात आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी लाभले आणि त्यांनी या समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले आणि तुकाराम बीज च्या पवित्र दिनाचे औचित्य साधल्याबद्दल आभारही मानले. जीवनविद्येच्या नामधारकांनी त्यांचे स्वागत विश्वप्रार्थनेच्या गजरात केले व जीवनविद्येचा ग्रंथ भेट देऊन त्यांना सन्मानित केले.

सकाळी १०.०० ते १०.३० वाजेपर्यंत जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली ही रॅली नवीन पनवेल पोस्ट ऑफिस पासून एचडीएफसी सर्कल, श्रेयस हॉस्पिटल आणि श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालय येथे रॅलीची सांगता झाली आणि जवळ जवळ ५०+ नामधारक ह्या रॅलीमध्ये उपस्थित झाले. तसेच हा कार्यक्रम श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालय, सेक्टर १९, नवीन पनवेल (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला. जीवनविद्येच्या नामधारकांनी त्यांचे स्वागत विश्वप्रार्थनेच्या गजरात केले व जीवनविद्येचा ग्रंथ भेट देऊन त्यांना सन्मानित केले.

याप्रसंगी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनीही भेट दिली आणि या कार्याचे कौतुक केले व जीवनविद्येचा ग्रंथ भेट देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात आले. पनवेलच्या प्रसिद्ध पॅथॉलॉजी डॉक्टर आरती मलिक, डॉक्टर मकरंद निकुंभ आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटची सर्व टीम या अभियानासाठी उपस्थित होती.या अभियानात ७०+ जागृत लोकांनी अवयवादानाचे संमती पत्र सादर केले, या कार्यक्रमाच्या नियोजनात जीवनविद्या मिशनच्या ज्ञानसाधना केंद्र, नवी मुंबई २ अंतर्गत स्वानंदयोग साधना केंद्र पनवेलचे अध्यक्ष भारत नागे, सचिव किरण वाणी आणि खजिनदार भालचंद्र देसाई व कार्याध्यक्ष अरुण नाईक आणि सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ नामधारक सहभागी झाले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech