आतापर्यंत ३ नक्षल्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त केलीत
रायपूर : छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात ही चकमक होत आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. आतापर्यंत चकमकीत ३ मृतदेह सापडले आहेत आणि शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. या घटनेबाबत, विजापूरचे एसपी जितेंद्र यादव म्हणाले की, सुरक्षा दलाचे पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले होते. यादरम्यान, नक्षलवाद्यांच्या एका पथकाशी चकमक झाली. चकमकीच्या ठिकाणी ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.या चकमकीत ५०० हून अधिक सैनिकांनी घेरले असून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.