श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा व चंदनउटी पूजा नोंदणी पहिल्याच दिवशी फुल्ल

0

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदनउटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुरुवात करण्यात आली होती. त्यास भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा व चंदनउटी पुजेची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४ व दुसर्‍या टप्प्यात दि.१ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीतील तर आता तिसर्‍या टप्प्यात दि. १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीतील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या सर्व पूजा भाविकांना ऑनलाईन पध्दतीने नोंदणीस उपलब्ध करून दिल्या होत्या. या तिसर्‍या टप्प्यामध्ये राज्याच्या विविध कानाकोपर्‍यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली आहे. भाविकांना https://www.vitthalrukmini या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून पूजेची नोंदणी करता येईल. ऑनलाईन पध्दतीने पूजा उपलब्ध करून दिल्यामुळे भाविकांना घरबसल्या पूजा नोंदणी करता येत असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. या ऑनलाईन नोंदणीला चांगला प्रतिसाद भाविकांनी दिल्याचे व्यवस्थापक मनेाज श्रोत्री यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech