पंतप्रधान रविवारी नागपूर दौऱ्यावर

0

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ३० मार्च रोजी नागपूरला भेट देणार आहेत. नागपूर भेटीदरम्यान पंतप्रधानांचे ४ प्रमुख कार्यक्रम आहेत. नागपूर दौऱ्यात मोदी सर्वप्रथम सकाळी ९ वाजता रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर येथे दर्शन घेऊन त्यानंतर दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर माधव नेत्रालयातील प्रीमिअम केंद्राची पायाभरणी करतील. यावेळी पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर मध्ये माधव नेत्रालय प्रीमिअम केंद्राची पायाभरणी होणार असून त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

त्यानंतर दुपारी १२:३० वाजता, ते नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड येथे लॉइटरिंग युद्धपयोगी सामग्री चाचणी तळ आणि यूएव्हीसाठी धावपट्टी सुविधेचे उद्घाटन करतील. हिंदू नववर्षानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर येथे दर्शन घेतील आणि आद्य सरसंघचालकांना आदरांजली वाहतील. तसेच पंतप्रधान दीक्षाभूमीला भेट देऊन आदरांजली वाहतील. यासोबतच पंतप्रधान माधव नेत्रालय नेत्र चिकित्सा आणि संशोधन केंद्राच्या नवीन विस्तारित इमारतीची म्हणजे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी करतील. माधव नेत्रालय नागपूरमधील एक प्रमुख सुपर-स्पेशालिटी नेत्ररोग सेवा सुविधा केंद्र आहे. माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०१४ मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली. आगामी प्रकल्पात 250 खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि १४ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्ररोग संबंधित सेवा प्रदान करणे आहे, हा यामागील उद्देश आहे.

पंतप्रधान नागपुरातील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या दारूगोळा केंद्राला भेट देणार आहेत. नि:शस्त्र हवाई वाहनांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या १२५० मीटर लांब आणि २५ मीटर रुंद हवाई पट्टीचे आणि लोइटरिंग युद्धसामग्री आणि इतर मार्गदर्शित युद्धसामग्रीची चाचणी घेण्यासाठी प्रत्यक्ष युद्धसामग्री आणि वॉरहेड चाचणी सुविधेचे उद्घाटन करतील. नागपुरातील या कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर ते छत्तीसगडला रवाना होतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech