जळगाव : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतली असून, पहिल्यांदाच सोने ९२ हजारांवर तर चांदी १ लाख ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दररोज चढ-उतार अनुभवणाऱ्या बाजारात या वाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधीच आलेली ही झेप ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम करू शकते.
सोन्या-चांदीचे सध्याचे दर (जळगाव बाजार):
सोने (विना जीएसटी): ८९,७०० रुपये प्रति १० ग्रॅम
चांदी (विना जीएसटी): १,०२,०००रुपये प्रति किलो
सोने (जीएसटीसह): ९२,००० रुपये प्रति १० ग्रॅम
चांदी (जीएसटीसह): १,०५,००० रुपये प्रति किलो
IBJA नुसार देशपातळीवरील दर (प्रति १० ग्रॅम):
२४ कॅरेट: ८९,१६४ रुपये
२३ कॅरेट: ८८,८०७ रुपये
२२ कॅरेट: ८०,६७४ रुपये
१८ कॅरेट: ६६,८७३रुपये
१४ कॅरेट: ५२,१६१रुपये
चांदी (१ किलो): १,००,८९२रुपये
दरवाढीची कारणे : सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, रशिया-युक्रेन युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरणात्मक निर्णय आणि २ एप्रिल रोजी यूएसएमध्ये लागू होणारे ट्रारिफ रेट्स या सर्व बाबी सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरत आहेत.
सणासुदीतील खरेदीला झळ: गुढीपाडव्यासारख्या सणासुदीच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी खरेदी करतात. मात्र या दरवाढीमुळे अनेकांचा खरेदीचा मूड संपू शकतो, असे तज्ज्ञांचे आहे.