ग्लोबल कोकणमुळे दोन हजार डझन हापूस लंडनच्या बाजारपेठेत

0

रत्नागिरी : ग्लोबल कोकण संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांचा सुमारे दोन हजार डझन हापूस लंडनच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाला आहे. हापूस आंब्याला योग्य भाव आणि कोकणातील शेतकरी, बागायतदारांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्लोबल कोकण संस्थेच्या माध्यमातून हापूस आंबा अभियान राबवण्यात येत आहे. गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधण्यासाठी बागायतदार, शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना कोकणातील हापूस आंब्याने युरोपवारी साधली आहे. ग्लोबल कोकण संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांचा सुमारे दोन हजार डझन हापूस लंडनच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय चलनाप्रमाणे एक डझन आंब्याला लंडनमध्ये २१०० रुपये दर मिळाला आहे.

कोकणातील हापूस आंब्याला योग्य भाव आणि येथील शेतकरी, बागायतदार यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून हापूस आंबा अभियान राबवण्यात येत आहे. त्यातून, लंडनच्या बाजारपेठेमध्ये हापूस आंबा दाखल झाला आहे. हापूस आंबा अभियानासाठी आमदार प्रसाद लाड यांच्यासह लांजा येथील आबिद काजी, रत्नागिरी येथील कळंबटे, दीपक उपळेकर, दत्तात्रय तांबे, देवगड येथील नरेश डामरी आणि शेतकरी, बागायतदारांनी नियोजन केल्याचे ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी सांगितले. हापूस आंब्याला लंडनमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तेजस भोसले, सचिन कदम यांनी युरोपमध्ये राहून मार्केटिंगसाठी सहकार्य केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech