‘अभिजात मराठी’साठी लवकरच समिती गठित – उदय सामंत

0

मुंबई : मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून आता भाषेच्या संशोधन आणि विकासासाठी आणि भाषेच्या उन्नतीसाठी काम करण्यात येत आहे. यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत सांगितले. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक विभागास १०० दिवसांमध्ये करावयाची उद्दिष्टे दिली आहेत, त्या अनुषंगाने मराठी भाषा मंत्री सामंत यांच्या अध्यकतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मराठी भाषा विभागाचे सहसचिव दादासाहेब भोसले तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषा मंत्री सामंत म्हणाले की, मराठी पुस्तकांना पुरस्कार देण्यात येतो. मात्र, वाचक हा पुस्तक खरेदी करताना प्रथम पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून पुस्तक घेतो. त्यामुळे मराठी पुस्तकांच्या उत्तम मुखपृष्ठासाठी पुरस्कार देणेबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मंत्री सामंत म्हणाले की, मराठी भाषा विभागाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा भवन उभारण्याचे काम सुरू आहे. सीमा भागात असलेल्या गावामध्ये मराठी भाषेच्या प्रसारासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. मराठी भाषा विभाग हा सामान्य माणसापर्यंत पोहोचणारा विभाग असल्याने या विभागास अधिक सक्षमतेने काम करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech