ट्रम्प-मस्क यांच्या धोरणांविरुद्ध संतप्त लोकांनी १२०० ठिकाणी निदर्शने

0

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध अमेरिकेतील संतप्त लोकांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी हजारोंच्या संखेने हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले होते. या संतप्त लोकांनी देशभर विविध ठिकाणी निदर्शने केली. हे आंदोलन अमेरिकेतील विरोधकांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेतील ५० राज्यांमध्ये १२०० हून अधिक ठिकाणी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्या अमेरिकेसंदर्भातील धोरणांविरोधात हे ‘हॅन्ड्स ऑफ’ आंदोनल अथवा निदर्शन करण्यात आले.अमेरिकेच्या मिडटाउन मॅनहॅटनपासून अँकोरेज, अलास्का, तसेच अनेक राज्यांच्या राजधान्यांपर्यंत हजारो निदर्शक हातात पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले होते. अमेरिकेतील पोर्टलँड, ओरेगॉन आणि लॉस एंजेलिसमध्येही हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले आणि ट्रम्प सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली, दरम्यान, पर्शिंग स्क्वेअर ते सिटी हॉलपर्यंत रॅलीही काढल्या.

या निदर्शनात १५० हून अधिक संघटनांनी भाग घेतला होता. यात, सिव्हिल राइट्स ऑर्गनायझेशन्स, लेबर युनियन, LGBTQ+ चे वकील, निवडणूक कार्यकर्त्यांसह अनेक दिग्गजांचा समावेश होता. यावेळी काढण्यात आलेल्या सर्वच रॅल्यांमधून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि DOGE प्रमुख एलोन मस्क यांच्यावर, संघीय संस्थांमधून हजारो लोकांना काढून टाकणे, अर्थव्यवस्था, इमिग्रेशन आणि मानवी हक्क आदी मुद्द्यावरून जोरदार टीका करण्यात आली.अमेरिकेतील रिपब्लिकन राजवटीच्या सुरुवातीच्या आठवड्यांत आलेल्या अपयशानंतर करण्यात आलेले हे निदर्शन शांततेत पार पडले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech