ठाणे : नागोठणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्माकर पोवळे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने ठाणे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. दैनिक ‘सामना’ चे वृत्त संपादक राजेश पोवळे यांचे ते वडील होत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पोवळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
धार्मिक वृत्तीचे व मनमिळाऊ स्वभावाचे पद्माकर पोवळे हे पोस्टामध्ये दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर निवृत्त झाले होते. काही वर्षांपासून ते ठाण्यात राहत होते. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. पद्माकर पोवळे यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. जवाहर बाग येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.