कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने कारागृहात घेतला गळफास

0

नवी मुंबई : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली आहे. आज रविवारी(दि.१३) jपहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने मध्यवर्ती कारागृहातील बाथरुममध्ये आत्महत्या केली असल्याचं समोर आलं असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.त्याचा मृतदेह शवविच्छेदन साठी जे .जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल गवळीने एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२४ मध्ये लैंगिक अत्याचार केला आणि यानंतर तिची निर्घुण हत्या केली होती. त्यानंतर पत्नी आणि रिक्षाचालक मित्राच्या साहाय्याने तिचा मृतदेह कब्रस्तानात फेकून दिल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा मुख्य आरोपी विशाल गवळी याला शेगाव पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले होते. यानंतर तो तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र आज(दि.१३) पहाटे त्याने शौचालयात टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.घटनेनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन साठी जे .जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता. विशाल गवळीने तो राहात असलेल्या परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा गुन्ह्यांची नोंद होती. दरम्यान, विशाल गवळी याच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून निवृत्त न्यायाधीशांकडून याप्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech