रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एका नक्षल दाम्पत्यासह २२ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. शासनाच्या नक्षल सदस्य मुक्त ग्राम पंचायत अंतर्गत २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण करविण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांवर एकूण ४० लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. आत्मसमर्पित १ पुरूष व १ महिला नक्सलीवर प्रत्येकी ८ लाख रुपये, एक पुरूष व एका महिला नक्षलवादीवर प्रत्येकी ५ लाख रुपये, तसेच २ पुरूष व ५ महिलांवर प्रत्येकी २ लाख रुपये आणि एका पुरूष नक्षलवाद्यावर ५० हजार असे एकूण ४० लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस घोषित होते. नक्षल्यांना आत्मससमर्पणासाठी डीआरजी सुकमा, रेंज फिल्ड टीम (आरएफटी) कोंटा, सुकमा, जददलपूर सीआरपीएफ व कोबरा यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आत्मसमर्पित नक्षल्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते.