आकाशात दिसणार शुक्र, शनि आणि चंद्राचा संयोग

0

आगामी २५ एप्रिल रोजी दिसणार रोमांचक दृष्य

नवी दिल्ली : जगभरातील खगोल निरीक्षकांना आकाशात एक अद्वितीय आणि रोमांचक दृश्य अनुभवता येणार आहे. आगामी २५ एप्रिल रोजी आकाशात ट्रिपल प्लॅनेटरी कंजंक्शन (तीन ग्रहांचा संयोग) घडणार आहे. त्यामुळे आकाशात एक ‘हसणारा चेहरा’ दिसणार आहे. आकाश निरभ्र असल्यास या दृश्याचा आनंद जगभरातील कोणत्याही ठिकाणावरून घेता येईल. ग्रह संयोग तेव्हा होतो जेव्हा २ किंवा त्यापेक्षा अधिक अंतराळातील घटक एकमेकांच्या जवळ असतात आणि एकत्र दिसतात. जेव्हा ३ ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याला ट्रीपल प्लॅनिटरी कन्जक्शन म्हणून ओळखले जाते. अवकाशतज्ज्ञांनी सांगितले की, शुक्र, शनी आणि चंद्र या तीन अंतराळ पिंडांचा संयोग होईल, ज्यामुळे एक त्रिकोणीय आकृती तयार होईल, जी हसणाऱ्या चेहऱ्याचे रूप धारण करेल.
आगामी २५ एप्रिलच्या सकाळी, सूर्योदयापूर्वी, शुक्र आणि शनी ग्रह एकमेकांच्या जवळ दिसतील. शुक्र आणि शनी ग्रह हे मानवी चेहऱ्यावरील डोळ्यांच्या रूपात भासतील. आणि त्यांच्या खाली चंद्र हा अर्धचंद्र रूपात “मुख” म्हणून दिसेल. या रचनेतून एक हसणारा चेहरा तयार होईल. या खास दृश्याचे निरीक्षण २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी पूर्वेकडील आकाशात सूर्योदयाच्या एक तासभर आधी हे दृश्य दिसेल.या संयोगाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या विशेष उपकरणांची आवश्यकता नाही, कारण शुक्र आणि शनी प्रखरपणे दिसतील. मात्र, अधिक तपशील पाहण्यासाठी चांगली दुर्बिणी किंवा बायनॉक्युलर उपयोगी पडू शकतो.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech