नाशिकमध्ये सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगांना प्राधान्य हवं – छगन भुजबळ

0

नाशिक : जगात अनेक देश असे आहेत की ज्या ठिकाणी पर्यटन आणि सेवा क्षेत्रावर आधारित काम करत असल्याने प्रसिद्ध आहे. नाशिक शहराला अतिशय उत्तम असे हवामान लाभले असून पर्यटन आणि सेवा क्षेत्राला मोठा वाव आहे.नाशिकच्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी हॉटेल्स इंडस्ट्री अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे नाशिकमध्ये धूर ओकणारे उद्योग नको तर सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगांना प्राधान्य हवं असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक मध्ये आता एस एस के हा ब्रँड तयार झाला असून हा ब्रँड आता नाशिकबाहेर मेट्रो शहरे आणि परदेशात सुद्धा जावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. नाशिक शहरातील एस.एस.के सॉलीटेअर बुटिक हॉटेल ॲण्ड स्पा या नवीन वास्तूचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार अमरीशभाई पटेल, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,विशेष सरकारी वकील अजय मिसर,रतन लथ, नितीन भोसले,रवींद्र पगार ,शरद आहेर,संचालक शैलेश कुटे डॉ राजश्री कुटे, रंगोली आणि सलोनी कुटे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहरात अतिशय सुंदर अशा हॉटेल्स तयार होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. नाशिक हे अतिशय मोठ शहर असून नाशिकच वातावरण अतिशय अल्हाददायक वातावरण तसेच धार्मिक महत्त्व देखील या शहराला आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटनाला देखील मोठा वाव आहे. त्यामुळे याठिकाणी धूर ओकणारे कारखाने नको तर इतर उद्योग व्यवसायाला चालना मिळवा यासाठी आपले प्रयत्न आहे. याठिकाणी बोट क्लब, उड्डाणपूल, विमानतळ, रिंग रोड, धार्मिक स्थळांचा विकास अशी अनेक महत्वाची विकासकामे याठिकाणी करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech