‘एक्सरसाईझ डेझर्ट फ्लॅग-१०’ बहुराष्ट्रीय युद्धसरावात भारतीय हवाई दल झाले सहभागी

0

नवी दिल्ली : ‘एक्सरसाईझ डेझर्ट फ्लॅग-१० या महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय युद्धसरावात सहभागी होण्यासाठी, भारतीय हवाई दलाची एक तुकडी संयुक्त अरब अमिरातमधील अल धाफ्रा एअर बेस येथे दाखल झाली. या सरावामध्ये भारतीय वायुदलाची मिग-२९ आणि जॅग्वार ही लढाऊ विमाने सहभागी होत आहेत. एक्सरसाईझ डेझर्ट फ्लॅग हा संयुक्त अरब अमिरातींच्या हवाई दलाने आयोजित केलेला एक बहुराष्ट्रीय सराव असून यामध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, बहरीन, फ्रान्स, जर्मनी, कतार, सौदी अरेबिया, कोरियन प्रजासत्ताक, तुर्की, यूएई, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांची हवाई दले सहभागी होत आहेत. हा सराव २१ एप्रिल ते ८ मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

या सरावाचा उद्देश म्हणजे जगातील काही सर्वात सक्षम वायुदलांसह परिचालन ज्ञान आणि सर्वोत्तम प्रणालींची परस्परांमध्ये देवाणघेवाण करणे, तसेच गुंतागुंतीच्या आणि विविध प्रकारच्या लढाऊ मोहिमा एकत्रितपणे पार पाडणे. अशा प्रकारच्या सरावांमुळे सहभाग घेतलेल्या देशांमध्ये परस्पर सामंजस्य, आंतरपरिचालन क्षमता वाढते आणि सैन्य सहकार्य अधिक मजबूत होते. भारतीय वायुदलाचा सहभाग हा भारताच्या या क्षेत्रातील तसेच जागतिक पातळीवरील मित्र देशांबरोबरच्या संरक्षण संबंधांना आणि आंतर-संचालन क्षमतेस बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech