आता एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही – देवेंद्र फडणवीस

0

पुणे : राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तान नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल असे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांनी यासंदर्भातील बातम्या देताना खबरदारी घेण्याचे सांगितले. पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेला ७५ वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच पुणे महापालिकेच पहिले प्रशासक स. गो बर्वे यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे अर्बन डायलॉग हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की राज्यातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माध्यमांत चुकीच्या बातम्या आल्या आहेत. गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech