मुंबई : सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची “दशकपूर्ती” आणि “प्रथम सेवा हक्क दिन” निमित्त राज्यस्तरीय सोहळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस l, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक , राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव,ब्रँड अँबेसिडर पद्मश्री शंकर महादेवन, सोनाली कुलकर्णी यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.