मुंबई दि. २० : मुंबईत गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या घोषणा मागे आपली राष्ट्रहिताची भुमिका आहे केवळ व्यक्तिगत स्वार्थाच्या किंवा पदांच्या राजकारणा पलिकडे जावून आपण हा निर्णय घेतल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. बिनशर्त पाठिंबा आहे पण. . असे सांगत राज्याच्या हितासाठी काही मागण्या असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
ते म्हणाले की, १९ ९२ पासून २०२४ पर्यत राम मंदीराचा रखडलेला मुद्दा मार्गी लावणे ३७० कलम अश्या काही ठोस निर्णयामुळे भाजपच्या सक्षम नेतृत्वाची प्रचिती आल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले की मोदी असल्यानेच राम मंदीर झाले हे सत्य आहे. त्याशिवाय एन आर सीच्या मुद्यावरही चांगला निर्णय झाल्याने धेडगुजर कडबोळे होण्यापेक्षा मोदी यांना पाठिंबा देणे योग्य असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की राज्यासाठी आमच्या काही मागण्या आहेत असे म्हणत त्यांनी हे विषय योग्य त्या पध्दतीने मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, बेरोजगारीचा मुद्दा आणि औद्योगिक दृष्ट्या उद्योगपतींना महाराष्ट्रात उपलब्ध साधनांनुसार गुजरात खालोखाल लक्ष द्यावे , बिनशर्त पाठिंबा असला तरी आज पदाधिका-यांच्या बैठकीत भाजपकडे आमच्या मागण्या आणि कोणत्या भागात कोणत्या पदाधिका-यांशी भाजपनेसंपर्क साधायचा याची माहिती कळविणार असल्याचे ते म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांचा भाजपने योग्य सन्मान ठेवायला हवा असेही ते म्हणाले. भाजप तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे च्या ऊमदेवारांसाठी मनसेच्या वतीने कुठे किती सभा घेतल्या जातील याची यादी नंतर प्रसिध्द केली जाणार आहे, त्यात शिवाजी पार्क येथे २० मे पूर्वी नरेंद्र मोदी यांच्यासमवेत होणा-या सभेबाबत अद्याप काहीच निश्चिती नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. आचारसंहितेच्या नावाखाली लोककलांच्या माध्यमांतून प्रचार करण्यास बंदी घालण्याबाबत निवडणूक अधिका-यांना सवाल करा की असे कोणत्या नियमात लिहिले आहे दाखवा. असे त्यांनी सांगितले.