चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल

0

 

मुंबई : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नंदुरबार लोकसभा मतदार संघात १८ उमेदवारांचे ३१ अर्ज, जळगाव- २४ उमेदवारांचे ३६ अर्ज, रावेर – ३१ उमेदवारांचे ४५ अर्ज, जालना – ४७ उमेदवारांचे ६८ अर्ज, औरंगाबाद – ५१ उमेदवारांचे ७८ अर्ज, मावळ – ३८ उमेदवारांचे ५० अर्ज, पुणे- ४२ उमेदवारांचे ५८ अर्ज, शिरूर- ४६ उमेदवारांचे ५८ अर्ज, अहमदनगर- ४३ उमेदवारांचे ५५ अर्ज, शिर्डी-३१ उमेदवारांचे ४० अर्ज आणि बीड लोकसभा मतदारसंघात ७६ उमेदवारांचे ९९ अर्ज दाखल झाले आहेत.
0000

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech