माथेरान – एखादया पत्रकारांचं निधन झाल्यानंतर गावात त्याचं स्मारक उभारल्याचे किंवा रस्त्याला दिवंगत पत्रकारांचं नाव दिल्याची उदाहरणं अपवादात्मक आहेत..
पत्रकार संतोष पवार यांचं कोरोनानं निधन झाल्यानंतर माथेरानमधील महत्वाच्या चौकाला संतोषचं नाव देण्यात आलंय.. संतोषचं छोटेखानी स्मारक ही तिथं उभारलं गेलंय .. माथेरानकरांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील.. माथेरान या नावाचा ब्रॅण्ड करण्यात संतोष पवार यांचा मोठा वाटा होता..माथेरानसाठी सातत्यानं लढणारया पत्रकाराचे विस्मरण माथेरानकरांना झाले नाही ही बाब दु:खात ही आनंद देणारी आहे.. हल्ली पत्रकारांना वापरून सोडून देण्याचा ट्रेण्ड असताना माथेरानमध्ये वेगळं चित्र दिसलं.
कर्जत प्रेस क्लब, रायगड प्रेस क्लब, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने संतोष पवार यांच्या नावानं पुरस्कार योजना सुरू केलेल्या आहेत. मी देखील माझ्या माणिकबागेत पन्नास झाडांना मान्यवर पत्रकारांची नावं दिली आहेत.. घराजवळच्या एका झाडाला संतोष पवारांचं देखील नाव दिलं आहे. जेव्हा जेव्हा मी माणिकबागेत जातो तेव्हा झाडाकडं पाहून संतोषचं स्मरण होतच होतं.संघटना म्हणून आम्ही हे केलं त्यात विशेष असं काही नाही. चांगलं काम करणारया पत्रकारास समाजही विसरत नाही हे परवा माथेरानला गेलो असता जाणवलं..
संतोष पवार यांची आज जयंती..
त्यानिमित्त चळवळीशी नातं सांगणार्या आणि माथेरानवर जिवापाड प्रेम करणारया या लढवय्या पत्रकारास
विनम्र अभिवादन.