अहमदनगर – जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड येथील हेमाडपंती शिवमंदिरातील ५ फुटांच्या शिवपिंडीला तडे गेले आहेत.यामुळे शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान, पुरातत्व विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे.
हे हेमाडपंती शिवमंदिर असून दहाव्या-अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे एक मंदिर आहे. ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हरिश्चंद्रगडाचा परिसर पुरातत्त्व विभागाकडे आहे. मात्र, या विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे.५ फूट रुंंद व ५ फूट लांबीच्या शिवपिंडीचे जतन व संवर्धन व्हावे, अशी मागणी पाचनईचे सरपंच भास्कर बादड व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. हरिश्चंद्रगडावरील महादेवाची ही पिंड जीर्ण झाली आहे. तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे.