रत्नागिरी – महायुतीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा काही दिवसांपूर्वी सुटला. या मतदारसंघावर शिवसेनेचा पक्का दावा होता. तर दुसरीकडे भाजप नेते नारायण राणे हे देखील या मतदारसंघासाठी इच्छुक होते. त्यामुळे महायुतीत बरेच दिवस या जागेचा तिढा राहिला. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी अनेकदा माध्यमांसमोरदेखील रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेबाबातचा दावा केला होता. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघासाठी इच्छुक होते. सामंत बंधूंकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न देखील करण्यात आले. पण महायुतीत ही जागा भाजपचे नारायण राणे यांच्यासाठी सुटली. यानंतर किरण सामंत हे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीत आज वेगळाच प्रकार बघायला मिळाला.
महायुतीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा काही दिवसांपूर्वी सुटला. या मतदारसंघावर शिवसेनेचा पक्का दावा होता. तर दुसरीकडे भाजप नेते नारायण राणे हे देखील या मतदारसंघासाठी इच्छुक होते. त्यामुळे महायुतीत बरेच दिवस या जागेचा तिढा राहिला. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी अनेकदा माध्यमांसमोरदेखील रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेबाबातचा दावा केला होता. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघासाठी इच्छुक होते. सामंत बंधूंकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न देखील करण्यात आले. पण महायुतीत ही जागा भाजपचे नारायण राणे यांच्यासाठी सुटली. यानंतर किरण सामंत हे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीत आज वेगळाच प्रकार बघायला मिळाला.
किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत. उदय सामंत यांच्या कार्यालयावरील त्यांचेच बॅनर हटवण्यात आले आहेत. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत. संपर्क कार्यालयावर किरण सामंत यांचं नाव असावं, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळे संपर्क कार्यालयावर किरण सामंत यांचं नाव लावण्यात आलं आहे. आधीच्या संपर्क कार्यालयावर उदय सामंत यांचं नाव होतं.
उदय सामंत यांचे बॅनर हटवण्यात आल्यानंतर किरण सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “माझं कार्यालय आहे. तिथेच मी बसणार. माझ्या कार्यालयात काय करायचं हे मी ठरवणार, अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली आहे. शिवसेनेचं जिल्हा संपर्क कार्यालय हे माझ्या मालकीचं आहे”, असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे.