मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिकीट वाटपावरून नाराज असल्याने, कॉंग्रेस मधून बाहेर गेलेल्या संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ते क्रवारी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
संजय निरुपम हे लोकसभेसाठी उत्तर पश्चिम मतदार संघातून इच्छुक होते. परंतु या मतदार संघातून ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना मविआ कडून तिकीट देण्यात आल्याने निरुपम नाराज होते. आपण खिचडी चोराचा प्रचार करणार नाही अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व दिल्लीतील पक्ष् श्रेष्टींवरही टीका केली होती . त्यामुळे निरुपम यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली.
त्यानंतर निरुपम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह, त्यांच्या पक्षाच्या इतर काही नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या होत्या . त्यामुळे ते शिंदे गटात जाणार हे निश्चित झाले होते . आज त्यांनी बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री शिंदेंची पुन्हा भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, आपण शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.तसेच आपण शिंदेंची शिवसेना आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार करणार आहोत . मी पूर्वी शिवसेनेतच होतो. नंतर कॉंग्रेस मध्ये गेलो . आज माझी घरवापसी झाली असेही त्यांनी सांगितले .