लोकलमधून पडून सात दिवसांत तीन डोंबिवलीकर प्रवाशांचा मृत्यू

0

डोंबिवली- मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. राहुल पुरुषोत्तम अष्टेकर (४९) असे त्याचे नाव असून तो डोंबिवली पश्चिमेकडील श्रीधर म्हात्रे वाडीत राहत होता. गेल्या सात दिवसांत तीन डोंबिवलीकर तरुणांनी रेल्वेतून पडल्याने आपला जीव गमावला आहे.

याआधी सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या दाराजवळ उभे राहिलेल्या अवधेश दुबे, रिया राजगोर यांचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान या दुर्दैवी घटना घडल्या. लोकल गाड्यांची संख्या वाढूनही लोकल अपघातांची संख्या कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता . तर ८०० हून अधिक लोकल प्रवासी जखमी झाले होते. अशातच बुधवारी डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून राहुल अष्टेकर यांचा मृत्यू झाला. यातील दोन रेल्वे अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तर तिसऱ्या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech