संजय राऊत माझा छळ करत आहेत

0

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गो-हे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. गोरे यांनी स्वप्ना पाटकर यांचे निवेदन वाचून दाखवले आहे. यात संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

नीलम गो-हे यांनी स्वप्ना पाटकर यांचे कथित निवेदन वाचून दाखवले. त्यात असा उल्लेख आहे की, मी स्वप्ना पाटकर आईसोबत सांताक्रूझ येथे राहते. संजय राऊत माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ करत आहेत. आतापर्यंत हजारो पत्रं लिहिली तरी मला त्रास होतो आहे. जिथे जाते तिथे माझा पाठलाग होतो. ३ मे रोजी देखील माझा बीकेसी येथे पाठलाग झाला. याआधी देखील माझ्यावर हल्ला झाला आहे. गुन्हा दाखल आहे पण पुढे काहीच झाले नाही.

पुढे यात असा उल्लेख आहे की, संजय राऊत यांनी माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्टार गुप्तहेर नेमले आहेत. एकाला अटक देखील झाली पण संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली नाही. व्यंकटेशची संजय राऊत यांनी हत्या केली असू शकते. संजय राऊत यांनी मला धमकी दिली, शिवीगाळ केली पण कारवाई झाली नाही. संजय राऊत यांना पोलिस ठाण्यात बोलावले जात नाही. दुबई आणि पाकिस्तानातून धमकीचे कॉल आले. गाडीवर हल्ला करून धमकी देण्यात आली. घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या.

माझे चारित्र्य तपासण्यासाठी संजय राऊत यांनी पोलिसांना सांगितले होते. प्रताप दराडे यांच्या मदतीने गुन्हा नोंदवला. संजय राऊत यांनी मला वारंवार लज्जित केले आहे. संजय राऊत यांचा अहंकार तृप्त करण्यासाठी पोलिसांनी मला त्रास दिला. त्यांनी माझं समुपदेशनाचं काम बंद केलं. पत्राचाळ प्रकरणी मी केलेल्या खुलाशांमुळे त्यांना अटक झाली. संजय राऊत यांच्या बॉसकडे तक्रार केली आहे पण कारवाई झाली नाही. मला मारले जाईपर्यंत वाट बघू नका, अशी त्यांनी विनंती केली आहे, असा निवेदनात उल्लेख असल्याचे नीलम गो-हे म्हणाल्या. या आरोपांचा आणि लोकसभेचा काही संबंध नसल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech