जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

0

मुंबई – अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना हा सेक्स स्कँडल प्रकरणात देश सोडून फरार झाला आहे. रेवन्नाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक प्रज्वल एचडी देवेगौडा यांच्या बंगळुरू येथील घरी पोहोचले होते. यानंतर एचडी रेवन्ना यांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपी नेत्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रज्वल यांनी अटकपूर्व जामिनासाठी आणि एचडी रेवन्ना यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना आणि त्यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. प्रज्वलचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल देशाबाहेर पळून गेला आहे. तो जर्मनीत असल्याचं बोललं जात आहे.

प्रज्वल रेवन्ना हे कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसचे विद्यमान उमेदवार देखील आहेत. त्यांच्या लोकसभा जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. यानंतर त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले आणि तेव्हापासून तो लोकांसमोर आले नाहीत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

होलेनरसीपूरचे खासदार एचडी रेवन्ना 1994 मध्ये या जागेवरून पहिल्यांदा आमदार झाले. 1999 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र 2004 मध्ये ते पुन्हा आमदार झाले. 2018 मध्येही ते मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन आमदार झाले. 2023 मध्येही ते जिंकले, पण त्यांचा पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech