शहापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण शहरात १० मेऐवजी १५ मे रोजी भव्य जाहीर सभा होणार आहे. भिवंडी व कल्याण लोकसभा क्षेत्रासाठी होणाऱ्या या सभेला दोन्ही लोकसभा क्षेत्रातील महायुतीच्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महायुतीचे भिवंडीतील उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथे १० मे रोजी सभा होणार होती. मात्र, या सभेच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार कल्याण पश्चिम येथील वर्टेक्स कॉम्प्लेक्सशेजारील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भव्य व विक्रमी सभा होईल. या सभेला लाखो नागरिकांची उपस्थिती राहील, अशी माहिती श्री. कपिल पाटील यांनी दिली.