मध्यरात्र उलटूनही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज सुरु

0

Even after midnight, the District Central Bank continues its operations

पुणे : बारामतीत विरोधकांकडून मतदाराना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष यांनी केला आहे. बारामती शहरातील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहेत तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप देखील शहराध्यक्षांनी केला आहे. भोर तालुक्यात एका गावात रात्री पैशांचं वाटप झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांनी एक्स पोस्टवर व्हिडिओ शेअर करत पैसे वाटप झाल्याचा आरोप केलाय.

भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. या आरोपानंतर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. तणावातून वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. संशयीत वाहनामध्ये घड्याळ चिन्हाचे प्रचार करणारे काही साहित्य देखील आढळले. घडलेल्या प्रकरानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech