जळगाव : कासोदा पोलीस स्टेशन परीसर तसेच जिल्हयात उपवर लग्नाच्या वयात असणाऱ्या गरजु व्यक्तींना हेरुन त्यांच्याशी घेवुन त्यांच्याशी लग्न झालेल्या व त्यांना मुले असलेल्या मुलींशी लग्न लावुन दिले जाते.या मुली लग्ना नंतर काही दिवस चांगला संसार करतात व विश्वास संपादन करुन घरातून पैसे, सोने चोरुनं पळुन जातात अशी टोळी (रॅकेट) जिल्ह्यात सक्रीय असल्याची माहिती मिळाल्याने गुप्त बातमीदारांमार्फत माहीती प्राप्त करून सदर प्रकार उघडकीस आणुन कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्यातील फिर्यादी यांने दिलेल्या फिर्यादी नुसार यातील महिला आरोपी मोना दादाराव शेंडे, वय-25 वर्षे ,सरस्वती सोनु मगराज, वय-28 वर्षे दोन्ही रा. रायपुर (राज्य-छत्तीसगड), अश्वीनी अरुण थोरात वय-26 वर्षे रा. पांढुरना (मध्यप्रदेश) अशा तिघींचे कासोदा गावांतील तिन तरूणांसोबत आरोपी .सरलाबाई अनिल पाटील, वय-60 वर्षे , उषाबाई गोपाल विसपुते, वय-50 वर्षे दोन्ही नादेड ता. धरणगाव जिल्हा जळगांव यांनी लग्न लावून दिलेले होते. यातील एका आरोपी होने कबुल केले की, आम्हीं तिघींचे या पूर्वी लग्न झालेले असुन आम्हांला मुले आहेत व आम्ही तिघी फसवणुकीचा प्रकार करणे साठी घरुन महाराष्ट्रात आले असल्याची कबुली आरोपींनी दिली .