मलकापूर मतदारसंघात मतदानासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू

0

बुलडाणा – बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश रावेर लोकसभा मतदारसंघात असल्याने या मतदारसंघाच्या मतदानासाठी मलकापूर मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 ची घोषणा केली आहे. त्यानुसार 16 मार्च ते 6 जूनपर्यंत राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक असल्याने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय व निपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांनी मतदानाचा निश्चित केलेल्या दिनांकाच्या 48 तासाच्या अगोदर सदर मतदारसंघ सोडून जाणे आवश्यक आहे. तसेच अशा व्यक्तींनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये.

त्यानुसार मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक असल्याने 13 मे रोजी रावेर लोकसभा मतदारसंघातील मलकापूर विधानसभा मतदारसंघात मतदान होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच लोकसभा निवडणूक निर्भय व निपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मतदानाचा दिनांक व मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेनंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये, असे आदेश दिले आहे.

तसेच राजकीय नेते, कार्यकर्ते सदर मतदारसंघाचे मतदार नसतील अशा व्यक्तींनी मतदानाच्या निश्चित केलेल्या दिनांकाच्या 48 तासाच्या अगोदर सदर मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर बंदी आदेश मलकापूर विधानसभा मतदारसंघात 11 मे रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते 13 मे चे रात्री 22 वाजेपर्यंत लागू राहील. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई पोलिस अधिनिमय, 1951 चे कलम 135 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाहीस पात्र राहणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech