मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुरक्षा व्यवस्था भेदली?

0

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम कुमार असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा रविवारी (5 मे 2024) रात्री ठाण्याहून मुंबईला येत असताना ही घटना घडली. पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही तरुण थांबला नाही, त्यानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग सुरूच ठेवला अखेर पोलिसांनी त्याला थांबवलं आणि चौकशी केली. त्यावेळी त्यानं आपण अभिनेता असल्याचं सांगितलं. वांद्रे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

मुख्यमंत्र्यांचा ताफा रविवारी रात्री ठाण्याहून मुंबईला येत असताना ही घटना घडली. सी लिंकवर पोलीस वाहतूक नियमन करत होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी सी लिंकवरील लेन 7 आणि 8 ही रिकामी करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना त्या तरुणाला गाडी सहाव्या लेनमध्ये टाकण्यास वाहतूक पोलिसांनी सांगितलं. मात्र तरुण सातव्या लेनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घेतली. त्यानंतरही तरुण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे गाडी चालवत होता. वरळी सी लिंक येथे तरुणाला थांबण्याचा इशारा करूनही तरुण थांबला नाही. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवलं, चौकशीत त्यानं तो अभिनेता असल्याचं सांगितलं. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech