सोलापूर : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मतदाराकडून ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सांगोला तालुक्यातील बादलवाडीमधील ही घटना समोर आली आहे. सांगोल्यातील बादलवाडीत मतदाराकडून ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
एका तरुणाने मतदान करताना ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मतदारकेंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ईव्हीएम पेटवण्यामागचं नेमकं कारण काय, हे अद्याप समोर आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एका मतदाराने ईव्हीएमवर पेट्रोल टाकून आग लावली. ईव्हीएमला आग लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माढा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदारकेंद्रावरील हा प्रकार समोर आली आहे. दुपारी तीन वाजताची ही घटना आहे. या घटनेमध्ये दोन ईव्हीएम आणि सोबत असलेले बॅलेट हे तांत्रिक साहित्य जळालं आहे.