लोकसभेला 4 जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु

0

नागपूर – उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यादांच भारतीय जनता पक्षासोबत जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ 4 जागा आल्या. यामध्येही दोन उमेदवार आयात करावे लागले. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. दरम्यान, लोकसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत, यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा सारासार विचार करुन आम्ही कमी जागा घेतल्या आहेत. आम्ही जास्त जागांची मागणी केली होती, पण तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप करताना अडचणी येतात. हे विचारात घेऊन आम्ही कमी जागांवर समाधान मानले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागांवर उमेदवार दिले आहेत. महादेव जानकरांची जागा आम्ही तिन्ही पक्षांचा विचार करुन सोडली, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech