मुंबई – अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात आज किंचित घसरण झाली असून चांदीच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे १० ग्रॅम सोने किरकोळ २१ रुपयांनी स्वस्त होऊन ७१,६२४ रुपये झाले आहे. एक किलो चांदी ७५४ रुपयांनी महागली असून ८२,२९६ रुपये झाली आहे. ८ मे रोजी १ किलो चांदीची किंमत्त ८१, ५४२ रुपये होती. दिल्लीमध्ये २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत्त ७२,३१० रुपये आहे. मुंबईमध्ये २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत्त ७२,१६० रुपये आहे.
कोलकाता आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत्त ७२,१६० आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत्त ७२,२१० रुपये आहे. दरम्यान, उद्या अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी सोने खरेदी करणे विशेष शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते.