नवी दिल्ली – बॉलिवूडमध्ये बी आणि सी ग्रेडच्या सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटूंबियांच्या हत्येप्रकरणी तिच्या सावत्र वडिलांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २०११ मध्ये हे हत्याकांड झाले होते. असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे तब्बल १३ वर्षानंतर लैला खान आणि तिच्या कुटूंबाला न्याय मिळाला आहे. परवेझ टाक असे तिच्या सावत्र वडिलांचे नाव आहे. हत्या झाली तेव्हा लैला फक्त ३० वर्षांची होती. या प्रकरणानंतर खुनाचा संशय असलेल्या परवेझ टाकला अटक करण्यात आली. तो तब्बल १२ वर्षं कारागृहात होता. मात्र आता न्यायालयाच्या निर्णयानंतर १४ मे रोजी परवेझला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यात त्याला जास्तीत जास्त फाशी किंवा कमीत कमी जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
२०११ साली परवेझने लैला खान आणि तिच्या कुटूंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्महाउसमध्ये हत्या केली. त्यांचे मृतदेह त्याच फार्महाऊसमध्ये दफन केले होते. परवेझ हा लैलाच्या आईचा तिसरा नवरा होता. त्यावेळी त्याचे वय २९ वर्षे होते. लैलाचे वडील नादिरशाह पटेल यांनी लैला आणि तिच्या आईसोबत कुटूंबातील आणखी चार सदस्य बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानंतर हे हत्याकांड प्रकार उघडकीस आले होते. दुबई येथील व्यावसायिकाशी झालेल्या करारात हिस्सा न दिल्याच्या रागात परवेझने पाच जणांची हत्या केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते. याशिवाय लैलाच्या आईचे तिचा दुसरा पती आसिफ शेखसोबत जवळीक वाढवली होती. ही गोष्ट परवेझला पसंत नव्हती. त्यामुळे त्याने हत्या केल्याचे सांगण्यात आले होते.