4 जूनलाच निकाल येणार; पंकजांची भावनिक साद

0

बीड : मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसाठी आज उदयनराजे भोसले व अजित पवारांनी सांगता सभा घेतली. यावेळी, भाऊ धनंजय मुंडे हेही व्यासपीठावर होते. बीडमधील भाषणात पंकजा मुंडेंनी त्यांचे दिवंगत वडिल गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगितली. बीडमध्ये 13 मे रोजी मतदान होत असून 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. याच 4 जूनची आठवण सांगत पंकजा मुडेंनी बीडकरांना भावनिक सादही घातली. कारण, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर, 4 जून रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

मला दिल्लीला जायचं आहे, याचं पहिलं कारण मला जिंकायचं आहे आणि मी जिंकणारच आहे. मी मंत्री असताना या भागातील जी मशागत केली, येथील जी विकासकामे केली, त्याचा पुढचा टप्पा मला गाठायचा आहे. मला या भागासाठी उद्योग आणायचे आहेत, येथे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभा करायचं आहे, असे म्हणत पंकजा मुंडेनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला निवडून द्या, असे आवाहन बीडकरांना केले. तसेच, वडिलांच्या अंत्यसंस्काराची तारीख व निकालाची तारीख एकच असल्याचे सांगत भावनिक सादही घातली.

4 जून ही आपल्या निकालाची तारीख आहे, 4 जूनला याच हातांनी मी मुंडेसाहेबांचे अंत्यसंस्कार केले आहेत. मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून मी तुम्हाला मतदान मागत नाही. मुंडे साहेबांकडे बघून मला मत द्या, असेही कुठं म्हणणार नाही. मी जी कहानी सुरू केली होती, त्या कहानीला पूर्ण करण्यासाठीच 4 जूनला निकाल आहे, असे मला वाटतं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech